Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Thackeray Vs BJP: लाडक्या बहिणीच्या नावाखाली भाजपचे पैसे वाटप, ठाकरे गटाकडून विरोधानंतर पळ; ताडदेवमध्ये राडा  

Thackeray Vs BJP: लाडक्या बहिणीच्या नावाखाली भाजपचे पैसे वाटप, ठाकरे गटाकडून विरोधानंतर पळ; ताडदेवमध्ये राडा  

Thackeray Vs BJP: महापालिका मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना अनेक ठिकाणी पैशाच्या वाटपावरुन वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय. ताडदेव परिसरात (Tardeo) भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी विरोध केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं. प्रदीप छेडा, प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप असून ते मंत्री मंगल प्रभात लोढांचे जवळचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

महिलांच्या विरोधानंतर पळ काढला

ताडदेवमधील वॉर्ड क्रमांक 215 मध्ये पैसे मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची घटना घडली. लाडकी बही‍ण योजनेच्या नावाखाली भाजपचे प्रदीप छेडा, प्रकाश मोरे यांनी हे पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. मात्र, इमारतीमधील महिलांनी उलट प्रश्न केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं.

प्रदीप छेडा हा मंगल प्रभात लोढांचा जवळचे सहकारी मानला जातो. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप झाल्यानंतर त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ताडदेवमधील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं आहे.

ताडदेवमधील वॉर्ड क्र 215 ठाकरेंच्या शिवसेनेकडून किरण बाळसराफ तर भाजपकडून संतोष ढाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या भावना कोळी यांना रिंगणात उतरवलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!