Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

KL Rahul Century Celebration: शतक ठोकल्यावर केएल राहुलचं अनोखं सेलीब्रेशन, लाडकी लेक ‘अंगद’ साठी समर्पित; Video

KL Rahul Century Celebration: शतक ठोकल्यावर केएल राहुलचं अनोखं सेलीब्रेशन, लाडकी लेक ‘अंगद’ साठी समर्पित; Video

KL Rahul Century Celebration Video Rajkot ODI : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संकटमोचकाची भूमिका बजावत शानदार नाबाद शतक ठोकले. बुधवारी (14 जानेवारी) झालेल्या या सामन्यात राहुलने 112 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. मात्र, या शतकापेक्षाही त्याने शतक पूर्ण केल्यानंतर आपल्या लेकीसाठी केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

संकटात सापडलेल्या भारताला राहुलचा आधार
सामन्याची सुरुवात भारतीय संघासाठी अत्यंत खराब झाली होती. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 118 अशी बिकट झाली होती. अशा परिस्थितीत राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने प्रथम रवींद्र जडेजासोबत 73 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर नितीश कुमार रेड्डीसोबत 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

अन् मैदानात घुमला ‘राहुल’ आवाज

राहुलने संयमी फलंदाजी करत डावाच्या 49 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत आपले शतक पूर्ण केले. त्याने या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. शतक पूर्ण होताच राहुलने आपले हेल्मेट काढले. डाव्या हातातील ग्लोव्ह काढून प्रेक्षकांच्या दिशेने एक खास इशारा केला. हे सेलिब्रेशन त्याने आपली लाडकी लेक ‘अंगद’ हिच्यासाठी समर्पित केले. राहुलने हे सेलिब्रेशन पहिल्यांदाच केलेले नाही. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातही त्याने अशाच प्रकारे आपल्या लेकीप्रती प्रेम व्यक्त केले होते. ते पाहून राजकोटचे प्रेक्षक थक्क झाले. राहुलच्या या खेळीमुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी आता 285 आव्हान उभे राहिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!