पुणे : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमी येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २३ जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय विमा अकादमी, पुणे येथे फॅकल्टी सदस्य यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : फॅकल्टी सदस्य.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२६.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : recruitment@niapune.org.in
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक आणि वरिष्ठ व्यवस्थापक-आस्थापना राष्ट्रीय विमा अकादमी 25, बालेवाडी, बाणेर रोड, NIA P.O. पुणे – ४१११०४५.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://niapune.org.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


