Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election Result : मुंबईत पहिला विजय, काँग्रेसनं खातं उघडलं, ‘या’ उमेदवाराने उधळला गुलाल

BMC Election Result : मुंबईत पहिला विजय, काँग्रेसनं खातं उघडलं, ‘या’ उमेदवाराने उधळला गुलाल

BMC Election Result : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने अखेर आपलं खातं उघडलं असून पहिला विजय पक्षाच्या पारड्यात पडला आहे. प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांनी विजय मिळवला आहे.

या विजयासह मुंबईतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसची नोंद झाली असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईतल्या राजकीय लढतीत काँग्रेसने पहिला कौल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं आहे. आगामी निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून, मुंबईतील पुढील प्रभागांमधील निकाल राजकीय समीकरणं ठरवणारे ठरण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमधून भाजपचे 4 उमेदवार विजयी

कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. या प्रभागातून राजानंद महाडिक, प्रमोद देसाई, वंदना मोहिते आणि विजय माने यांनी विजय मिळवत भाजपची आघाडी अधिक मजबूत केली आहे. पहिला निकालच भाजपच्या बाजूने लागल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कोल्हापूरमध्ये भाजपची पकड अधिक बळकट होत असल्याचे चित्र आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!