Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sambhajinagar: संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज; माजी महापौर जखमी, संजय शिरसाटांचा संताप

Sambhajinagar: संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज; माजी महापौर जखमी, संजय शिरसाटांचा संताप

Sambhajinagar: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी महापौर विकास जैन हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांकडून अचानक लाठीचार्ज

आज सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी निकालाची उत्सुकता असल्याने कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरू केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी विकास जैन यांना घेरून मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात मोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले असून, त्यामध्ये पोलीस सामान्य नागरिकांना आणि प्रतिनिधींना अक्षरशः झाडाझुडपात गाठून मारहाण करताना दिसत आहेत. या कारवाईत केवळ नागरिकच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या काही पत्रकारांनाही पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करावा लागला आहे.

संजय शिरसाट यांचा संताप –

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली. पोलिसांचा हा ‘मस्तवालपणा’ असल्याचे सांगत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिरसाट म्हणाले की, “ज्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्रे आहेत अशा प्रतिनिधींनाही जनावरांसारखी मारहाण करण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळी पोलिसांनी किमान सामंजस्य दाखवणे आवश्यक होते.”

विशेषतः सागर देशमुख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकायला तयार नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असून, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मतमोजणीच्या सुरुवातीलाच झालेल्या या राड्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आता पोलीस आयुक्त यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!