Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात एकाच प्रभागातून आबा बागुल, अश्विनी कदम अन् सुभाष जगताप या 3 दिग्गजांचा पराभव

पुण्यात एकाच प्रभागातून आबा बागुल, अश्विनी कदम अन् सुभाष जगताप या 3 दिग्गजांचा पराभव

पुणे : महानगरपालिका निवडणुकीत सहकारनगर-पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून भाजपने मोठा धक्का देत चारही जागांवर विजय मिळवला आहे. या प्रभागातून भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत यश मिळवत एकाच वेळी तीन दिग्गज नेत्यांचा पराभव केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या निवडणुकीत आबा बागुल, अश्विनी कदम आणि सुभाष जगताप यांसारख्या अनुभवी नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे महेश वाबळे यांनी तब्बल 5,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तसेच शैलजा भोसले यांनी 2,595 मतांनी, सई थोपटे यांनी 2,400 मतांनी तर विना घोष यांनी सुमारे 4,000 मतांच्या फरकाने विजय संपादन केला आहे.

या क्लीन स्वीपमुळे पुण्यात भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रभाग 36 मधील हा निकाल निवडणुकीतील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!