Municipal Election Result : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्याच्या शहरी राजकारणात महायुतीने मोठी बाजी मारली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुतेक महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून निम्म्याहून अधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत.
नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह तब्बल 16 महानगरपालिकांमध्ये भाजपची थेट सत्ता आली आहे. उर्वरित महापालिकांमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली आहे.
मुंबई महापालिका
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेना महायुतीने विजय मिळवत ठाकरेंच्या शिवसेनेचा दीर्घकाळाचा बालेकिल्ला काबीज केला.
भाजप: 89 जागा
शिंदेसेना: 29 जागा
महायुतीला रोखण्यासाठी तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते. ठाकरे सेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा होता.
ठाकरे गट शिवसेना: 65
मनसे: 6
शरद पवार राष्ट्रवादी: 1
काँग्रेस: 24
अजित पवार राष्ट्रवादी: 3
AIMIM: 8
इतर: 2
राज्यभरातील पक्षनिहाय विजयी उमेदवार
भाजप: 1425
शिवसेना (शिंदे गट): 399
काँग्रेस: 324
राष्ट्रवादी (अजित पवार गट): 167
शिवसेना (ठाकरे गट): 155
राष्ट्रवादी (शरद पवार गट): 36
मनसे: 13
बसपा: 6
कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता?
मुंबई: भाजप-शिंदेसेना
ठाणे: शिंदेसेना-भाजप
नवी मुंबई: भाजप
कल्याण-डोंबिवली: शिंदेसेना-भाजप
उल्हासनगर: शिंदेसेना-स्थानिक आघाडी
भिवंडी-निजामपूर: त्रिशंकू
पनवेल: भाजप
मीरा-भाईंदर: भाजप
वसई-विरार: बविआ
नाशिक: भाजप
मालेगाव: स्थानिक आघाडी
धुळे: भाजप
जळगाव: भाजप
अहिल्यानगर: भाजप-अजित पवार राष्ट्रवादी
पुणे: भाजप
पिंपरी-चिंचवड: भाजप
सांगली-मिरज-कुपवाड: भाजप
सोलापूर: भाजप
कोल्हापूर: महायुती
छत्रपती संभाजीनगर: भाजप
परभणी: महाविकास आघाडी
नांदेड-वाघाळा: भाजप
लातूर: काँग्रेस
अमरावती: भाजप-युवा स्वाभिमान
अकोला: भाजप
नागपूर: भाजप
चंद्रपूर: काँग्रेस
जालना: भाजप
इचलकरंजी: भाजप
या निकालांमुळे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात भाजप आणि महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी हे निकाल महत्त्वाचे संकेत देणारे मानले जात आहेत.


