Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात श्वास रोखणारा थरार..! मध्यरात्री 2 वाजता अमोल बालवडकर विजयी; भाजपने शेवटपर्यंत लावला जोर

पुण्यात श्वास रोखणारा थरार..! मध्यरात्री 2 वाजता अमोल बालवडकर विजयी; भाजपने शेवटपर्यंत लावला जोर

Amol Balwadkar : पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 (बाणेर-पाषाण-सूस) येथे झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा 903 मतांनी पराभव केला. या प्रभागातील मतमोजणी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरू होती, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

अमोल बालवडकर आणि लहू बालवडकर यांच्यातील ही लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगली. आठव्या फेरीअखेर लहू बालवडकर यांची 1,135 मतांची आघाडी होती. मात्र नवव्या फेरीत अमोल बालवडकर यांनी जोरदार मुसंडी मारत ही आघाडी मोडीत काढली आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली.

यानंतर भाजपकडून सातवी, आठवी आणि नववी फेरीच्या फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केवळ नवव्या फेरीची फेरमतमोजणी मान्य केली. मात्र रात्री 12.45 वाजेपर्यंत भाजपकडून जोरदार मागणी झाल्यानंतर सातवी आणि आठवी फेरीही फेरमतमोजणीसाठी खुली करण्यात आली. रात्री 1 वाजता सुरू झालेल्या फेरमतमोजणीत उलट अमोल बालवडकर यांचे मताधिक्य अधिकच वाढले.

नियमित मतमोजणीअंती अमोल बालवडकर 650 मतांनी आघाडीवर होते. तिन्ही फेऱ्यांच्या फेरमतमोजणीनंतर त्यांना 903 मतांनी अधिकृत विजयी घोषित करण्यात आले. रात्री सुमारे 1.45 वाजता अमोल बालवडकर यांच्यासह प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपच्या रोहिणी चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे आणि भाजपच्या मयुरी कोकाटे यांनाही विजयी घोषित करण्यात आले.

विशेष म्हणजे, अमोल बालवडकर यांचे भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तिकीट कापले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या एका तासात त्यांची उमेदवारी जाहीर झाली. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या ‘पंगा’मुळेच अमोल यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!