Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापूरमध्ये राजकारण तापलं! प्रणिती शिंदेंवर टीका करताना भाजप नेते जयकुमार गोरेंचे वादग्रस्त विधान; म्हणाले “50 कदम…”

सोलापूरमध्ये राजकारण तापलं! प्रणिती शिंदेंवर टीका करताना भाजप नेते जयकुमार गोरेंचे वादग्रस्त विधान; म्हणाले “50 कदम…”

Jayakumar Gore : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कमालीचा वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला चांगले यश मिळाले आहे. यानंतर आता काँग्रेसच्या खासदाराने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्र्यांची जीभ घसरली असून, त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. आगामी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

50 कदम निचे गिरे है वह…

महापालिका पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं…. पर सिर्फ अगली छलांग लगाने” अशी टीका केली होती. या विधानावर जयकुमार गोरे यांनी टीका करताना “दो कदम पिछे नही हटे…..50 कदम निचे गिरे है वह भी टांग उपर” या भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलेच तापले असल्याचे चित्र आहे.

निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू

अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिला आहे. जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे काँग्रेस नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजप यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!