Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Japan Earthquake: जपानला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; प्रशासनाकडून भीषण त्सुनामीचा इशारा जारी, नागरिकांना तातडीने स्थलांतराचे आदेश

Japan Earthquake: जपानला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; प्रशासनाकडून भीषण त्सुनामीचा इशारा जारी, नागरिकांना तातडीने स्थलांतराचे आदेश

Japan Earthquake: भूकंपांची भूमी समजल्या जाणाऱ्या जपानला आज पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तर जपानच्या किनारपट्टीवर रिश्टर स्केलवर 7.4 तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला आहे. या प्रचंड धक्क्यानंतर जपान सरकारने सानरिकू किनारपट्टीसह लगतच्या भागांत त्सुनामीचा इशारा (Tsunami Warning) जारी केला असून, समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे.

समुद्रतळापासून १० किमी खोलीवर केंद्रबिंदू
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 4:53 च्या सुमारास (07:53 GMT) उत्तर जपानमधील सानरिकू किनारपट्टीजवळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या तळाशी सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर होता. जपानची राष्ट्रीय प्रसारक संस्था ‘NHK’ ने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रामध्ये 3 मीटरपर्यंत (10 फूट) उंचीच्या त्सुनामी लाटा उसळण्याची दाट शक्यता आहे. या लाटा कोणत्याही क्षणी किनारपट्टीवर धडकू शकतात, त्यामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये धोक्याचे सायरन वाजवून लोकांना सतर्क करण्यात आले आहे.

पंतप्रधान ताकाईची यांचे सुरक्षिततेचे आवाहन
जपानच्या पंतप्रधान ताकाईची यांनी या आपत्तीनंतर देशाला संबोधित करताना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “आओमोरी (Aomori) भागात भूकंपाची तीव्रता 5 पेक्षा जास्त जाणवली असून इवाते (Iwate) प्रांत आणि होक्काइदोच्या (Hokkaido) पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागांत धोका आहे, तिथल्या रहिवाशांनी एका क्षणाचाही विलंब न लावता उंचावरच्या ठिकाणी किंवा आपत्कालीन निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित व्हावे.”

पंतप्रधान कार्यालयात ‘संपर्क कक्ष’ स्थापन
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान कार्यालयाने ‘आपत्ती व्यवस्थापन केंद्रा’अंतर्गत एक विशेष ‘संपर्क कक्ष’ (Liaison Room) कार्यान्वित केला आहे. या केंद्राद्वारे बचाव कार्य आणि मदत मोहिमांचे थेट नियंत्रण केले जात आहे. सध्या मानवी आणि भौतिक हानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जपानचे लष्कर आणि मदत पथके (SDRF) कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!