Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Election Results : अवघ्या ‘त्या’ 14 जागांमुळे उद्धव ठाकरेंचा गेम फसला; पराभवाचं अंतर पाहून बसेल धक्का

Mumbai Election Results : अवघ्या ‘त्या’ 14 जागांमुळे उद्धव ठाकरेंचा गेम फसला; पराभवाचं अंतर पाहून बसेल धक्का

Uddhav Thackeray News : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी सत्ता मिळवण्यात त्यांना यश आलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या गटाला 65 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या. दुसरीकडे भाजपने 89 जागा जिंकत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला.

मात्र निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, उद्धव ठाकरेंच्या 14 उमेदवारांचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. हे उमेदवार जिंकले असते, तर ठाकरे गटाच्या जागा 79 पर्यंत पोहोचल्या असत्या आणि मनसे व काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याच्या अधिक जवळ ते गेले असते.

प्रभाग क्रमांक 179 मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार दीपाली खेडकर यांचा अवघ्या 503 मतांनी पराभव झाला. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये लीना गुढेकर यांना केवळ 876 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अशा अनेक जागांवर अत्यल्प मतफरकामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.

मनसेने 50 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. मनसेला जर 20 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला असता, तर मुंबईत ठाकरे बंधूंचा महापौर बसण्याची शक्यता निर्माण झाली असती.

विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांपैकी चार उमेदवारांचा पराभव 500 पेक्षा कमी मतांनी झाला आहे, तर 11 उमेदवारांचा पराभव 1 हजार मतांपेक्षा कमी अंतराने झाला आहे. त्यामुळे काही मोजक्या मतांनी मुंबईतील सत्तेचं गणित बदललं असतं, असं चित्र समोर आलं आहे.

अत्यल्प मतांनी पराभूत झालेले उद्धव ठाकरेंचे उमेदवार

वैशाली पाटणकर 121
दीपाली खेडकर 503
देवेंद्र आंबेकर 538
सतीश पवार 569
लीना गुढेकर 876
सौरभ घोसाळकर 797
शिल्पा भोसले 781
सुधीर खातू 769
सुप्रिया गाडगीळ 934
स्मिता गावकर 935
हर्षदा पाटील 943
प्रसाद आयरे 1 हजार 82
प्रमोद शिंदे 1 हजार 91
प्रणिता निकम 1 हजार 22

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, अवघ्या काही मतांनी उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील सत्तेचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!