Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Eknath Shinde : मुंबईच्या महापौरपदाचा पेच दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची गुपचूप दिल्ली वारी; भाजप नेत्यांसोबत खलबतं

Eknath Shinde : मुंबईच्या महापौरपदाचा पेच दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची गुपचूप दिल्ली वारी; भाजप नेत्यांसोबत खलबतं

Eknath Shinde Delhi Visit: मुंबई महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निर्णय आता दिल्लीतूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निकाल लागून पाच दिवस उलटले तरी महापौरपदाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणालाही सुगावा लागू न देता अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या या गुप्त भेटीमुळे मुंबईच्या सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ आता दिल्लीत गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सत्तावाटपावरून रस्सीखेच

मुंबईत भाजप आणि शिंदे गट यांच्यात सत्तावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असतानाच मंगळवारी रात्री एक महत्त्वाची घडामोड घडली. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वाची चर्चा झाली. शिंदे गट आपल्या काही विशिष्ट मागण्यांवर ठाम असल्यानेच हा ‘सरप्राईज’ दिल्ली दौरा आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – Mumbai Mayor BMC Election 2026 : महापौरपदावर तडजोड नको! फडणवीसांना दिल्लीतून थेट आदेश; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?

संख्याबळाच्या गणिताचा विचार केला तर मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमताचा ११४ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांचे समर्थन मिळवणे अपरिहार्य आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यास हे संख्याबळ ११८ पर्यंत पोहोचते, जे बहुमतापेक्षा ४ ने जास्त आहे. आपल्या नगरसेवकांची फूट टाळण्यासाठी शिंदे गटाने त्यांची प्रमाणपत्रे आधीच जमा करून घेतली होती. हॉटेलमधील मुक्काम संपवून या नगरसेवकांना घरी पाठवताच शिंदेंनी तातडीने दिल्ली गाठली.

या दिल्लीतील बैठकीत केवळ मुंबईच्या महापौरपदावरच चर्चा झालेली नाही, तर एमएमआर (MMR) क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या महापालिकांबाबतही रणनीती ठरल्याचे समजते. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतही सत्तावाटपाचा कोणता फॉर्म्युला राबवायचा, यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर, शिंदे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईच्या महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याचे उत्तर आता दिल्लीतील या हायव्होल्टेज चर्चेनंतरच स्पष्ट होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!