Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मोठा दिलासा! ‘या’ प्रकरणात मिळाली क्लीन चिट

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मोठा दिलासा! ‘या’ प्रकरणात मिळाली क्लीन चिट

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. बहुचर्चित महाराष्ट्र सदन आणि तळोजा गृहप्रकल्प गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) लावलेल्या आरोपातून विशेष न्यायालयाने त्यांची मुक्तता केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) आता ईडीच्या खटल्यातूनही त्यांना ‘क्लीन चिट’ मिळाली आहे.

नेमका निकाल काय?

मुंबईतील विशेष PMLA न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी छगन भुजबळ यांच्यासह अन्य ४० आरोपींचे अर्ज मंजूर केले. ‘प्रेडिकेट ऑफेन्स’ (मूळ गुन्हा) अस्तित्वात नसेल, तर मनी लाँड्रिंगचा खटला चालवता येत नाही, हा कायदेशीर आधार घेत न्यायालयाने सर्वांची या प्रकरणातून सुटका केली आहे.

हेही वाचा – BMC Mayor: मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

दरम्यान, एसीबीने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यात भुजबळ आधीच दोषमुक्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर मूळ गुन्हाच टिकला नाही, तर ईडीचा मनी लाँड्रिंगचा खटलाही रद्द होतो. भुजबळ यांच्या वकिलांनी हाच मुद्दा कोर्टात लावून धरला होता की, ज्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने खटला भरला, त्यात तथ्य आढळले नसल्याने ईडीची केस आता उभी राहू शकत नाही.

भुजबळांसाठी विजयाचा क्षण

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत छगन भुजबळ यांना तुरुंगवासही सोसावा लागला होता. मात्र, आधी एसीबी आणि आता थेट ईडीच्या खटल्यातून दोषमुक्त झाल्याने त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे मोठे सावट दूर झाले आहे. या निकालामुळे भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!