Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shambhavi Pathak: आर्मी ऑफिसरची लेक अन् 1500 तासांचा अनुभव…अजितदादांच्या विमानाचे सारथ्य करणारी कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Shambhavi Pathak: आर्मी ऑफिसरची लेक अन् 1500 तासांचा अनुभव…अजितदादांच्या विमानाचे सारथ्य करणारी कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Shambhavi Pathak: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती विमानतळाजवळ लँडिंग करताना झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजितदादांसह विमानातील सर्व पाच जणांचा अंत झाला. या विमानाचे नियंत्रण ज्यांच्या हाती होते, त्या कॅप्टन शांभवी पाठक आणि मुख्य पायलट सुमित कपूर यांच्या अनुभवावर अखेर नियतीने घाला घातला.

आर्मी ऑफिसरची कन्या अन् १५०० तासांचा अनुभव
कॅप्टन शांभवी पाठक या एक अत्यंत हुशार आणि जिद्दी वैमानिक होत्या. मूळ मुंबईच्या असलेल्या शांभवी यांचे वडील सैन्य दलात (Indian Army) अधिकारी पदावर कार्यरत होते, त्यामुळे देशसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. शांभवी यांना १५०० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांच्या सोबत असलेले मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर हे तर १६,००० तासांच्या अनुभवाचा डोंगर पाठीशी असलेले दिग्गज वैमानिक होते. मात्र, इतका मोठा अनुभव असतानाही बारामतीतील त्या ‘काळ्या’ क्षणी तांत्रिक दोष किंवा निसर्गाचा कोप वरचढ ठरला.

हेही वाचा – Ajit Pawar Plane Crash: नियतीचा क्रूर घाला! अजितदादांच्या शेवटच्या प्रवासातील ‘ते’ पाच जण कोण? विमान दुर्घटनेतील मृतांची नावे समोर

शिक्षण आणि व्यावसायिक प्रवास
शांभवी पाठक यांनी आपले करिअर अतिशय मेहनतीने घडवले होते:

  • पदवी: मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशन सायन्समध्ये त्यांनी बी.एससी. पूर्ण केले होते.
  • आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण: २०१८-१९ मध्ये न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीतून त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते.
  • प्रोफेशनल करिअर: २०२२ पासून त्या ‘VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांना स्पाइसजेट आणि जेट ओरिएंटेशन ट्रेनिंगचे (A-320 विमान) मानांकित परवानेही मिळाले होते.

विमानात कोण-कोण होते?
या दुर्घटनेत विमानाचा स्फोट होऊन विमानातील सर्वांचाच होरपळून मृत्यू झाला. मृतांची यादी खालीलप्रमाणे आहे: १. अजित पवार (उप उपमुख्यमंत्री) २. कॅप्टन सुमित कपूर (मुख्य पायलट) ३. कॅप्टन शांभवी पाठक (सह-पायलट) ४. विदीप जाधव (सुरक्षा रक्षक) ५. पिंकी माळी (क्रू मेंबर)

एका कर्तव्यदक्ष नेत्यासोबतच राज्याने आज शांभवी पाठक आणि सुमित कपूर यांच्या रूपाने दोन अत्यंत कुशल वैमानिक गमावले आहेत. या भीषण अपघातामुळे महाराष्ट्राच्या विमान वाहतूक क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!