Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Plane Crash: नियतीचा क्रूर घाला! अजितदादांच्या शेवटच्या प्रवासातील ‘ते’ पाच जण कोण? विमान दुर्घटनेतील मृतांची नावे समोर

Ajit Pawar Plane Crash: नियतीचा क्रूर घाला! अजितदादांच्या शेवटच्या प्रवासातील ‘ते’ पाच जण कोण? विमान दुर्घटनेतील मृतांची नावे समोर

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत सभांचा धडाका लावण्यासाठी निघालेल्या अजितदादांच्या विमानाला बारामती विमानतळावर उतरताना काळाने गाठले. सकाळी ८:५० च्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजितदादांसह विमानातील एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांची अधिकृत नावे आता समोर आली आहेत.

विमानातील ‘त्या’ पाच जणांची नावे
या दुर्घटनेत अजितदादांसोबत सावलीसारखे राहणारे त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिक दलाचाही अंत झाला आहे: १. अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) २. विदीप जाधव (खासगी सुरक्षारक्षक, मुंबई) ३. सुमित कपूर (मुख्य पायलट कॅप्टन) ४. संभवी पाठक (सह-पायलट कॅप्टन) ५. पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट).

निवडणुकीच्या रणधुमाळीत काळाचा घाला
अजित पवार आज पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या आज एकूण चार सभांचे नियोजन होते. पायाला भिंगरी बांधल्यासारखा प्रचार करणाऱ्या दादांनी बारामतीतील सभेसाठी मुंबईहून उड्डाण घेतले होते. मात्र, सभेच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळल्याने महाराष्ट्राने आपला ‘कार्यसम्राट’ नेता गमावला आहे.

पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; सुप्रिया सुळे भावूक
या घटनेने पवार कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे. आपल्या लाडक्या भावाच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर “Devastated” (उद्ध्वस्त) असा शब्द लिहून आपल्या तीव्र वेदना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी (५ डिसेंबरला) बहरीनमध्ये पार पडला होता. घरात लग्नाचा आनंद ओसरण्यापूर्वीच या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बारामतीमध्ये कडकडीत बंद
आपल्या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीकरांनी आज आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले आहेत. बारामतीसह संपूर्ण देशभरातून अजितदादांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात असून, एका कार्यक्षम प्रशासकीय पर्वाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!