Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Plane Crash : ‘विमान उतरलं की सर्वात आधी…’; अजितदादांची ती शेवटची इच्छा अपूर्णच

Ajit Pawar Plane Crash : ‘विमान उतरलं की सर्वात आधी…’; अजितदादांची ती शेवटची इच्छा अपूर्णच

Ajit Pawar Plane Crash : ‘विमान लँड झालं की थेट काटेवाडी गाठायचीय, आईला भेटून मगच सभेला निघायचंय…’ हे अजित पवारांचे शेवटचे शब्द एखाद्या काळजाला चटका लावणाऱ्या स्वप्नासारखे ठरले. २८ जानेवारीच्या त्या दुर्दैवी दिवशी नियतीने बारामतीच्या भूमीवर असा काही घाला घातला की, धडाडीच्या नेतृत्वाचा हा प्रवास मातोश्रींच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कायमचा थांबला.

त्या सकाळी नेमकं काय घडलं?
अजित पवारांचे विश्वासू सहकारी किरण गुजर यांनी त्या काळरात्रीपूर्वीच्या काही तासांचा थरार उलगडला आहे. त्यांच्या मते, सकाळी ७ वाजताच दादांनी फोन करून ८:४५ ला विमानतळावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्याकडे निवडणुकीची महत्त्वाची कागदपत्रे द्यायची होती. दिवसभरात चार तोफखाना सभा गाजवण्याचा त्यांचा निर्धार होता, पण त्याआधी त्यांना ओढ लागली होती ती म्हणजे आपल्या आई आशाताईंची भेट घेण्याची. अजित पवार बारामतीत पाऊल ठेवताच सर्वात आधी आईकडे धाव घेत. कामाचा कितीही डोंगर असला तरी काटेवाडीच्या घरी आईसोबत घालवलेला तो अर्धा तास त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्रोत असायचा. त्या दिवशीही आईचे आशीर्वाद घेऊनच ते प्रचाराच्या मैदानात उतरणार होते, परंतु नशिबाचा कौल काही वेगळाच होता.

हेही वाचा – सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांचा कार्यभार? उपमुख्यमंत्रिपदासोबतच मिळणार ‘या’ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

विमानतळावरील तो भीषण तांडव
धावपट्टीवर दादांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या किरण गुजर यांनी आपल्या डोळ्यांनी मृत्यूचे तांडव पाहिले. त्यांनी सांगितलेला प्रसंग सुन्न करणारा आहे. ‘आकाशात विमान दिसलं खरं, पण त्याचा वेग खूपच विसंगत होता. लँडिंगच्या प्रयत्नात असतानाच विमानाने हवेत दोन भयानक गिरक्या घेतल्या आणि ते थेट जमिनीवर आदळलं. पाहता पाहता विमानाचा आगीचा गोळा झालं,’ असं गुजर यांनी सांगितलं.

कर्तव्याची कागदपत्रे आणि अखेरचा श्वास
स्फोट इतका भीषण होता की एक मृतदेह विमानाबाहेर फेकला गेला. गुजर जेव्हा घटनास्थळी धावले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देह ओळखण्यापलीकडे गेला होता, तरीही चाळीस वर्षांच्या ऋणानुबंधातून त्यांनी आपल्या नेत्याला ओळखले. विशेष म्हणजे, ज्या फाईल्स आणि कागदपत्रांसाठी दादांनी सकाळी फोन केला होता, ती सर्व कागदपत्रे त्यांच्या मृतदेहाभोवती विखुरलेली होती. शेवटच्या श्वासापर्यंत हा लोकनेता जनतेच्या कामातच गुंतलेला होता, याची साक्ष ती विखुरलेली पाने देत होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!