Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांचा कार्यभार? उपमुख्यमंत्रिपदासोबतच मिळणार ‘या’ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांचा कार्यभार? उपमुख्यमंत्रिपदासोबतच मिळणार ‘या’ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ होत असून, सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर रिकामी झालेली सत्ताकेंद्राची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या शपथविधीसोबतच त्यांच्याकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी असेल, याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अर्थ खात्याबाबत अद्याप निर्णय नाही

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क व क्रीडा अशी महत्त्वाची खाती होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभाग ही खाती सोपवली जाणार आहेत. मात्र, अर्थ खात्याची जबाबदारी सध्या त्यांच्याकडे दिली जाणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर या खात्याबाबत पुनर्विचार होऊन ही जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवारांकडे जाण्याची शक्यता आहे.

आजचा कार्यक्रम आणि प्रक्रिया
दरम्यान, आज दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. यात सुनेत्रा पवार यांची ‘विधिमंडळ गटनेते’ म्हणून अधिकृत निवड केली जाईल. तथापी, संध्याकाळी ५ वाजता राजभवनावर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी संपन्न होईल. आज केवळ त्यांचाच शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नियमानुसार सुनेत्रा पवार यांना त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.

शरद पवारांची तटस्थ भूमिका
सुनेत्रा पवारांच्या या राजकीय प्रवासावर शरद पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी कोणीतरी पुढे येणे आवश्यक होते आणि तो निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. आमचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी कौटुंबिक नाते जपले जाईल. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेल्या या निर्णयावर आपण भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!