Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात, सुनेत्रा पवारांकडे अन्य तीन खात्यांचा भार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात, सुनेत्रा पवारांकडे अन्य तीन खात्यांचा भार

मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शपधविधीनंतर काही वेळातच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्याकडील अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार का याची उत्सुकता होती. मात्र दादांकडील अर्थ खाते वगळून अन्य खात्यांची धुरा सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याची धुरा देण्यात आली आहे. अर्थ व नियोजन खातं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली तिन्ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहे. मात्र, अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस मांडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळावं, यासाठी अजित पवार फार आग्रही होते. म्हणून खातेवाटप होताना अर्थ खातं हे राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं. शिवसेनेला नगर विकास आणि भाजपकडे महसूल आणि गृह ठेवण्यात आलं होतं. अर्थ खातं राष्ट्रवादीकडून गेल्याने मोठं खात आता राष्ट्रवादीकडे नाही.

अर्थ खातं फडणवीसांकडे, सुनेत्रा पवारांकडे तीन खाती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडे असलेली तीन खाती देण्यात आली आहे. क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. म्हणजेच राज्याच्या 2026-27 चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील, हे स्पष्ट झालं आहे.

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी थोड्या वेळापूर्वी शपथ घेतली आहे. आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे महायुती सरकारमधील तीन खाती देण्यात आली आहेत. सुनेत्रा पवार आता बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या दहाव्याचा कार्यक्रम होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीत राहणार आहेत. यावेळी त्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, मात्र हार -बुके स्वीकारणार नसल्याची माहिती आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!