Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुनेत्रावहीनी उपमुख्यमंत्री मग आता ’वंदनाकाकी’ ’सभापती’; पाबळ गणातील महिलांची जोरदार मागणी

सुनेत्रावहीनी उपमुख्यमंत्री मग आता ’वंदनाकाकी’ ’सभापती’; पाबळ गणातील महिलांची जोरदार मागणी

शिरुर: अजितदादांच्या एवढ्या मोठ्या प्रसंगानंतरही ज्या पध्दतीने सुनेत्रावहीनी थेट उपमुख्यमंत्री झाल्या, त्याबद्दल त्यांच्या धाडसाचे खरोखरीच कौतुक आहे. आता सुनेत्रावहीनी उपमुख्यमंत्री झाल्याच आहेत तर शिरुरच्या सभापती आम्हाला वंदनाकाकी पवार यांनाच करायचंय. त्यासाठी त्यांना आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी करु असा निर्धार पाबळ-केंदूर (ता.शिरुर) गणातील महिलांनी नुकताच केला.

अजितदादांच्या पश्चात ज्या धाडसाने सुनेत्रावहीनींनी उपमुख्यमंत्रीपदावर काम करण्याची तयारी दाखविली ती खरोखरीच धाडसाची आहे. त्यांच्या याच गुणाने आम्हीही प्रभावित झालो असून अजितदादांचे आरोग्य, शिक्षण, पाणी आणि सर्वांग प्रगतीचे स्वप्न पाबळ गणात आपण सत्यात आणणार आणि सुनेत्रावहीनींना पाबळ गणात भेटीसाठी यायला भाग पाडणार असा निर्धार पाबळ (ता.शिरूर) पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार वंदना प्रकाश पवार यांनी पाबळ (ता.शिरूर) येथे व्यक्त केला.

जातेगाव खुर्द, जातेगाव बुद्रुक, मुखई, खैरेनगर-खैरेवाडी, हिवरे आणि धामारी परिसरात आज (ता.०१) वंदना प्रकाश पवार व पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवारांसह महिलांनी घरोघरी मतदार भेटीचा दौरा पार पाडला. यावेळी प्रत्येक घरात अजितदादांच्या आठवणींनी महिलांनी अक्षरश: अश्रुंना वाट करुन दिली. याच वेळी ज्या पध्दतीने सुनेत्रावहीनींनी उपमुख्यमंत्रीपदी जाण्याची तात्काळ तयारी दर्शविली त्याबद्दल सर्वच महिलांनी त्यांचे कौतुक आणि त्यांच्या धाडसाबद्दल अभिमान व्यक्त केला. दरम्यान पाबळ गण हा यापूर्वी अजितदादांच्यामुळे शिक्षण-आरोग्य, रस्ते आणि इतर शासकीय सुविधांमुळे उत्तम झालेला आहे. ज्या काही शिल्लक समस्या आहेत त्या पोटतिडकीने आपण पूर्ण करुन येत्या काळात सुनेत्रावहीनींना आदर्श पाबळ गण भेटीसाठी आपण यायला भाग पाडू असा निर्धार यावेळी वंदना पवार यांनी महिलांशी बोलताना व्यक्त केला.

वंदनाकाकींना ’सभापती’ करायचंय : सौ.अनिता बगाटे (पाबळ, ता.शिरूर)

शिरुर पंचायत समितीत सभापतीपदाचे आरक्षण जे आलेले आहे, त्याला पाबळ गणातील वंदनाकाकी पवार या पात्र असून त्यांना आम्ही विक्रमी मतांनी विजयी करणार आहोत. वंदनाकाकींना सभापती करायंचय यासाठी वेळ पडल्यास थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रावहीनींना गळ घालू पण सभापतीपद पाबळमध्येच आणू असा निर्धार आम्हा सर्व महिलांचा आहे.

वंदनाकाकींसाठी मतांचा विक्रम करणार : सौ.सारीका चौधरी (पाबळ, ता.शिरूर)

वंदनाकाकी विक्रमी मतांनी विजयी होतील यासाठी आम्ही गणातील सर्व महिलांनी चंग बांधला आहे. लाडकी बहीण योजना ज्या अजितदादांनी सुरू केली त्यांचे ऋण आम्ही वंदनाकाकींच्या रुपाने परत फेडणार आहोत.

’पाबळ’ला पहिल्यांदाच सभापतीपदाची संधी : सौ.सविता रत्नपारखी (पाबळ, ता.शिरुर)

यावेळी योगायोगाने पाबळ गणातून वंदनाकाकी पवार उभ्या आहेत आणि त्यांच्या आणि आमच्या नशिबाने शिरुरचे सभापतीपदाचे आरक्षणही त्यांच्या मनासारखे आलेले आहे. त्यामुळे यावेळी आलेली ही सभापतीपदाची संधी पाबळकरांसाठी सुवर्णसंधी समजून आम्ही विक्रमी मतांनी त्यांना विजयी करणार आहोत

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!