Jay Pawar Post: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. नियतीच्या या भीषण घातातून सावरणे अद्याप पवार कुटुंबीयांना आणि महाराष्ट्राला शक्य झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर, अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी प्रथमच सोशल मीडियावर व्यक्त होत आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या या पोस्टने नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
“आयुष्यभर तुम्हाला अशीच मिठी मारून राहिलो असतो…”
जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या वडिलांसोबतचे दोन अतिशय खास फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत दोघेही निसर्गरम्य परिसरात निवांत उभे असल्याचे दिसत असून, जय यांनी त्याला ‘डॅड, तुमची खूप आठवण येतेय’ असे भावूक कॅप्शन दिले आहे. दुसऱ्या फोटोत जय यांनी अजितदादांना मिठी मारली आहे. या फोटोसोबत त्यांनी आपल्या मनातील आर्त साद घातली आहे. जय पवारांन म्हटलं आहे, “काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठी मारून आयुष्यभर तसाच राहिलो असतो.” या शब्दांतून पितृछत्र हरवल्याचे दुःख आणि वडिलांप्रती असलेली ओढ स्पष्टपणे दिसून येत आहे.
— Jay Ajit Pawar (@Jaypawarspeaks) February 2, 2026
हेही वाचा – मोठी बातमी! आठवड्यातील आजची कॅबिनेट बैठक रद्द; सुनेत्रा पवार ‘या’ तारखेला जाणार मंत्रालयात
अजितदादांचा अपघात
दरम्यान, २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी ही दुर्घटना घडली. अजित पवार यांचे विमान मुंबईहून सकाळी ८:१० वाजता बारामतीसाठी रवाना झाले होते. सकाळी ८:४३ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाला. दाट धुक्यामुळे दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. धावपट्टीवर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्याला आग लागली. या स्फोटात विमानातील कोणालाही वाचवता आले नाही. तथापी, पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरात संपूर्ण राज्य त्यांच्या पाठीशी उभे असून, सोशल मीडियावर अजितदादांना मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहिली जात आहे.


