Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Boycott ZP Election 2026: दुपार लोटली तरी ईव्हीएमचं बटण एकदाही दाबलं नाही, तासगाव अन् परभणीत ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; नेमकं कारण काय?

Boycott ZP Election 2026: दुपार लोटली तरी ईव्हीएमचं बटण एकदाही दाबलं नाही, तासगाव अन् परभणीत ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; नेमकं कारण काय?

Boycott ZP Election 2026: परभणी जिल्हा परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे, यातच परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गाव आणि तांडा येथील गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीवरील पुलासाठी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि हा बहिष्कार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कायम आहे. गावात दुपारी साडेतीन पर्यंत ही एकही मतदान झालं नाही. मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे तहसील कार्यालयातील टीम गावात दाखल झाली होती. त्यांनी या सर्व गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रस्ता करून देण्याच्या मागणीसाठी हे गावकरी आग्रही आहेत आणि जोपर्यंत रस्ता होत नाही. तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केलाय त्यामुळे गावात अद्याप पर्यंत एकही मतदान झालेलं नाही.

गावातील रस्ता आणि करपरा नदीवर पूल करून देण्याची मागणी
परभणीच्या सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद गटातील बोथ व बोथ तांडा या दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. गावातील रस्ता तसेच करपरा नदीवर पूल बांधून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे मागच्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न इथे प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी रात्री बैठक घेवून ईश्वर साक्षी शपथ घेतली आहे जोपर्यंत आमच्या गावाला चांगला रस्ता व नदीवरील पूल होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी आज मतदान केंद्रावर कुणीही मतदान करण्यासाठी गेले नाही गावात जवळपास ५०० च्या आसपास मतदान आहे.

तासगावातील बलगवडे गावात नागरिकांचा मतदानावर बहिष्कार कायम
तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याची माहिती समोर आली आहे. 4 वाजून गेले तरी गावातील मतदान केंद्रावर एकही मतदान नाही, आता मतदान होण्याची देखील शक्यता कमी आहे. गावातील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तासगाव कवठेमंहाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांची या गावच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावाच्या प्रश्नावर लोकांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, लोकशाही मार्गाने आपले प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायला हवे असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

बलगवडे गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार कायम
तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. 4 वाजून गेले तरी गावातील मतदान केंद्रावर एकही मतदान नाही, आता मतदान होण्याची देखील शक्यता कमी आहे. गावातील गायरान जमिनीवर सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तासगाव कवठेमंहाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांची या गावच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावाच्या प्रश्नावर लोकांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, लोकशाही मार्गाने आपले प्रश्न मांडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायला हवे असं त्यांनी म्हटलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!