Pune Zilla Parishad Election Result 2026 : उत्तर पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि मावळ तालुक्यांमध्ये सर्वप्रथम टपाली मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक अधिकारी अनिल दौंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन तासांत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन बहुतांश निकाल स्पष्ट होतील. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टपाली मतांत राष्ट्रवादीची आघाडी
प्राथमिक कलानुसार, उत्तर पुणे जिल्ह्यातील टपाली मतदानात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सुरुवातीची आघाडी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार का, की महायुती पलटवार करणार, याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. मतमोजणी जसजशी पुढे जाईल, तसतसे अधिकृत निकाल स्पष्ट होतील.


