Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NovaPods ची तयारी सुरु; ‘या’ दिवशी इअरबड्ससह स्मार्टवॉच होणार लाँच

NovaPods ची तयारी सुरु; ‘या’ दिवशी इअरबड्ससह स्मार्टवॉच होणार लाँच

नवी दिल्ली : भारतीय ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड Ai+ त्यांच्या प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. स्मार्टफोननंतर, कंपनी आता AIoT प्रॉडक्ट्स लाँच करत आहे. कंपनीकडून २४ फेब्रुवारीला नवीन प्रॉडक्ट्स लाँच करणार आहे, ज्यामध्ये स्मार्टवॉच आणि इअरबड्सचा समावेश असेल.

कंपनी NovaPods ऑडिओ सीरीज आणि NovaWatch वेअरेबल सीरीज लाँच करत आहे. हे प्रॉडक्ट्स Ai+ च्या कनेक्टेड इकोसिस्टमच्या पुढील टप्प्याचे असणार आहे. कंपनीने अलीकडेच त्यांच्या फ्लिप फोन लाँच केले आहेत. मात्र, त्याची लाँच तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. कंपनी NovaPods ऑडिओ सीरीजमध्ये तीन उत्पादने लाँच करणार आहे. हे इअरबड्स विशिष्ट युजर्ससाठी असणार आहेत. कंपनीने फॅशन-फॉरवर्ड टेक या टॅगलाइनसह या उत्पादनांची टीझ केली आहे. या सीरीजमधील बेस मॉडेल NovaPods Go असेल, जे एंट्री-लेव्हल युजरला टार्गेट करेल.

यामध्ये १० मिमी ड्रायव्हर असेल. हे डिव्हाइस IPX4 वॉटर रेझिस्टंट आहे आणि त्यात अल्ट्रा-लो लेटन्सी आहे. हे एकूण २४ तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देते. हे इअरबड्स फॉरेस्ट ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि आइस ब्लू व्हाइट या कलरमध्ये उपलब्ध असणार आहेत. यातून ३० तासांचा प्लेटाईम मिळणार आहे. इअरबड्स ड्युअल पेअरिंग मोड आणि हायब्रिड अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशनसह येतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!