Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NCP Merger : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विलिनीकरणाचं पहिलं पाऊल; राज्यात पुढचं पाऊल कधी?

NCP Merger : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विलिनीकरणाचं पहिलं पाऊल; राज्यात पुढचं पाऊल कधी?

पुणे : जुन्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा पहिला राजकीय संकेत मिळाल्याचं चित्र दिसत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत पुणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. माजी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत पुढे एकत्रित राजकीय वाटचाल करण्याची घोषणा केली.

दरम्यान, बेनके यांनी जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा मुद्दा पुढे आणताच काही स्थानिक नेत्यांनी मात्र ही घडामोड स्थानिक राजकीय समीकरणांमुळे झाल्याचं सांगितलं.

यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या एकजुटीचा फायदा झाल्याचं निकालातून स्पष्ट झालं. पुणे जिल्ह्यातील ७३ पैकी तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली. जुन्नर तालुक्यातील ८ गटांपैकी ४ जागा राष्ट्रवादीच्या गटाला, तर उर्वरित जागा इतर पक्षांकडे गेल्या.

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभर राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा रंगली असताना, जुन्नरमधील हा निर्णय पुढील मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!