LPG Booking Methods: देशभरात एलपीजी (LPG) सिलिंडर्ससाठी गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाच, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सध्याच्या टंचाईच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयाने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत घरगुती गॅस बुकिंगच्या सोप्या पद्धती स्पष्ट केल्या आहेत. ग्राहकांना आता गॅस एजन्सीवर जाऊन तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नसून, ते 5 विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून आपले बुकिंग सुरक्षित करू शकतात.
घरबसल्या बुकिंगचे 5 डिजिटल पर्याय
पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, Bharat Gas, Indane आणि HP Gas या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी खालील सुविधा उपलब्ध आहेत:
- WhatsApp: कंपनीने दिलेल्या अधिकृत क्रमांकावर मेसेज करून बुकिंग करता येईल.
मिस्ड कॉल (Missed Call): नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊन सिलिंडर बुक करता येतो. - IVRS/SMS: इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमद्वारे कॉल करून किंवा एसएमएस पाठवून प्रक्रिया पूर्ण करता येते.
- मोबाईल ॲप्लिकेशन्स: ‘Hello BPCL’, ‘Indian Oil One’ आणि ‘HP Pay’ यांसारख्या ॲप्सचा वापर करून एका क्लिकवर बुकिंग शक्य आहे.
- अधिकृत वेबसाइट्स: संबंधित कंपन्यांच्या पोर्टलवर (उदा. my.ebharatgas.com, cx.indianoil.in, myhpgas.in) जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येते.
घरेलू एलपीजी सिलेंडर की बुकिंग तेल विपणन कंपनियों द्वारा उपलब्ध कई सुविधाजनक माध्यमों से आसानी से की जा सकती है।
घरेलू एलपीजी उपभोक्ता घर बैठे इन माध्यमों से एलपीजी रिफिल बुक कर सकते हैं:
• WhatsApp के माध्यम से
• SMS / IVRS के माध्यम से
• संबंधित OMC के मोबाइल ऐप के माध्यम… pic.twitter.com/VXqkGpBnon— Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) March 14, 2026
रांगांमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारचे आवाहन
देशाच्या अनेक भागांत नागरिक पहाटे 3:00 वाजेपासून रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. काही ग्राहकांनी तीन-तीन दिवस रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाने या डिजिटल पर्यायांचा वापर करण्यावर भर दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) ही प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून, यामुळे वितरकाच्या केंद्रावर जाण्याची कसरत वाचणार आहे. गॅस टंचाईच्या अफवांवर विश्वास न ठेवता, डिजिटल माध्यमातून बुकिंग करून आपला क्रमांक निश्चित करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.


