Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Heavy Rain : सावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Heavy Rain : सावधान! राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Heavy Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवसभर तापमान वाढत असताना दुसरीकडे अचानक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 ते 19 मार्चदरम्यान मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभावही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामानातील बदलाचे कारण

सध्या पंजाब हरियाणा राजस्थान या भागांमध्ये पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान येथे पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. या हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

16 मार्च – या जिल्ह्यांना यलो अलर्ट

सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड ,परभणी, यवतमाळ, चंद्रपूर ,गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर जालना संभाजीनगर, हिंगोली, नांदेड भंडारा येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे ,नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथेही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

7 मार्च – पावसाचा इशारा कायम

सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा ,चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

18 मार्च – विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ ,वर्धा ,चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

19 मार्च – उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

नंदुरबार ,धुळे, नाशिक, सांगली, सोलापूर, धाराशिव ,लातूर, परभणी ,हिंगोली ,नांदेड ,वर्धा ,नागपूर, भंडारा, चंद्रपूर ,गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार मराठवाड्यात 16 ते 19 मार्चदरम्यान काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!