Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील,रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप; म्हणाल्या, 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील,रुपाली पाटलांचे खळबळजनक आरोप; म्हणाल्या, 58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार

Ashok Kharat Case: भोंदू बाबांकडून महिलांवर अत्याचाराच्या अनेक घटना आजपर्यंत एकल्या. आता ताजी घटना नाशिकमधून समोर येत आहे. गेल्या काही वर्षात ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून नाव कमावलेल्या अशोक खरात याने ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. या घटनेत आधी त्याने महिलेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. असे अनेक अपराध त्याने याआधी केल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात याचा राजकीय वर्तुळात वावर असल्याने त्याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून नागरिकांचा विश्वास संपादन करून महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली.त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पेन ड्राइव्ह आढळले.ते जप्त करण्यात आले. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती आहे. धक्कादायक बाबम्हणजे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांच्या बुवया उंचावल्या. आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याशिवाय, त्यांच्यावर अशोक खरात याच्याविरोधातले पुरावे नष्ट केल्याचे आरोपही केले आहेत.

रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील
रूपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत म्हटले की, हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. 1 वर्षापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का? 58 व्हिडिओ आहेत. म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार, असा आरोप त्यांनी केलाय.

…तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार
रूपाली ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या की, सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा विषय टाकणार आहे. संविधानिक पदावर असल्यामुळे, तपास योग्य होणार नाही, त्यांनी रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले.

अशोक खरात कोण ? नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरात याला ताब्यात घेतले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, गेल्या काही वर्षांत ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!