Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात; IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात; IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी लोणावळ्याजवळ झालेल्या एका कार अपघातात आयआयटी (IIT) मुंबईच्या 3 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांतील ही दुसरी मोठी दुर्घटना असून एक्सप्रेसवे पुन्हा एकदा ‘डेथ ट्रॅप’ ठरत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे आयआयटी पवई परिसरात आणि मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

कसा घडला हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवई येथील आयआयटी मुंबईत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी बुधवारी कारने लोणावळ्याला सहलीसाठी गेले होते. गुरुवारी पहाटे मुंबईच्या दिशेने परतत असताना लोणावळ्याजवळ त्यांच्या पोलो कारवरचा ताबा सुटला आणि कार भीषणरीत्या पलटी झाली. यामध्ये ओमकुमार बोरसे (23), लय भारत (22) आणि श्रेयांश शर्मा या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात किंवा अतिवेगामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, कारचा झालेला चक्काचूर अपघाताची भीषणता स्पष्ट करत आहे.

एक्स्प्रेसवेवर मृत्यूचे सत्र; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हा अपघात इतका भयंकर होता की, एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 24 तासांपूर्वीच याच महामार्गावर एका कंटेनरने 5 वाहनांना चिरडले होते, ज्यामध्ये 3 जणांचा बळी गेला होता. गेल्या दोन दिवसांत एकूण 6 जणांनी आपला जीव गमावल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेगावर मर्यादा आणण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

बचावकार्य आणि वाहतुकीची सद्यस्थिती
अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, ‘देवदूत’ यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि लोकमान्य ॲम्ब्युलन्सचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना कटरच्या साहाय्याने मोठ्या कष्टाने बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हायवे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!