Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! चाकणकरांनंतर आता ‘या’ माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट! चाकणकरांनंतर आता ‘या’ माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड

Ashok Kharat Case: नाशिकमधील वादग्रस्त ‘कॅप्टन’ आणि स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या गैरकृत्यांनी आता महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. खरातचे पाय धुतानाचा आणि त्याच्यासाठी छत्री धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आपले पद गमवावे लागले. मात्र, हे प्रकरण केवळ चाकणकरांपर्यंत मर्यादित नसून, आता यात एका माजी मंत्र्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांनी या माजी मंत्र्याच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात; सिन्नरमधील जमीन व्यवहारांचा संशय
या प्रकरणात पोलिसांनी दीपक लोंढे नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी उचलले आहे. लोंढे हा शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय मानला जातो. नाशिकच्या सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात लोंढेचा मोठा प्रभाव आहे. अशोक खरातने नाशिक जिल्ह्यात जमवलेली अफाट आणि बेहिशोबी मालमत्ता उभी करण्यासाठी लोंढेने मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. याच आर्थिक आणि व्यावसायिक हितसंबंधांच्या धाग्यादोऱ्यांचा शोध घेण्यासाठी एसआयटीने (SIT) ही कारवाई केली आहे.

एसआयटीच्या चौकशीचा रोख आणि राजकीय धाबे दणाणले
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या पथकाने दीपक लोंढेची अनेक तास चौकशी करून खरातच्या आर्थिक साम्राज्याबद्दल महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. खरातने ‘न्युमरोलॉजिस्ट’ बनून अनेक बड्या राजकीय आणि व्यावसायिक हस्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते. लोंढेच्या माध्यमातून आता खरातचे इतर कोणते राजकीय भागीदार आहेत, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या तपासामुळे नाशिकमधील अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले असून, खरातच्या बेकायदेशीर जमिनींच्या व्यवहारात आणखी कोणाकोणाचे हात गुंतले आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.

तपासाची व्याप्ती वाढणार
दीपक लोंढेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस आता अशोक खरातच्या इतर व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. न्युमरोलॉजीच्या नावाखाली सुरू असलेल्या या संघटित गुन्हेगारीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातने जमवलेली माया आणि त्याला मिळालेले राजकीय संरक्षण हा आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!