Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Anjali Damania: ‘राजीनामा देतानाही चक्क पोज देऊन उभ्या होत्या…’; अंजली दमानियांची रूपाली चाकणकरांवर निशाणा

Anjali Damania: ‘राजीनामा देतानाही चक्क पोज देऊन उभ्या होत्या…’; अंजली दमानियांची रूपाली चाकणकरांवर निशाणा

Anjali Damania: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर पायउतार झाल्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संस्थेच्या स्वायत्ततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “महिला आयोग ही संस्था राजकारण्यांच्या पुनर्वसनासाठी नसून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आहे,” असे स्पष्ट करत दमानिया यांनी या पदावर कोणत्याही राजकीय नेत्याची वर्णी न लावता, एखाद्या कर्तव्यदक्ष IPS अधिकाऱ्याची किंवा निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याची आग्रही मागणी केली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे संस्थेचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

केवळ राजीनामा पुरेसा नाही; फौजदारी कारवाईची मागणी
रूपाली चाकणकर यांचा राजीनामा हा या प्रकरणाचा शेवट नसून केवळ सुरुवात असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी जर जाणीवपूर्वक तक्रारींकडे दुर्लक्ष केले असेल किंवा त्या दाबण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यांच्यावर थेट FIR दाखल व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी ‘अनामिका’ नावाच्या पात्राचा शोध घेणे आणि त्यामागील पडद्यामागचे सूत्रधार समोर आणणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकारण्यांचे चेहरे उघडे करण्याची गरज
महाराष्ट्राच्या राजकारणातील महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेचा गैरवापर होणे हे राज्याच्या संस्कृतीला कलंक असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व बड्या राजकीय नेत्यांची नावे जनतेसमोर आणून राजकारण स्वच्छ करण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. राजीनामा देताना चाकणकर यांच्या देहबोलीवर (पोज) टीका करताना दमानिया यांनी संताप व्यक्त केला की, सत्ताधाऱ्यांमध्ये आता कायद्याची भीती उरलेली नाही.

यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
गुन्हे करा आणि सत्ता गाजवा, अशी मानसिकता सध्या बळावली असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. जर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी त्या दाबल्या गेल्या, तर सामान्य पीडित महिलेने कुणाकडे दाद मागायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यंत्रणेवरील सर्वसामान्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आयोगाचे कामकाज राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवून तिथे निष्पक्ष आणि कठोर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी शेवटी अधोरेखित केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!