Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता अर्धा गॅस मिळणार, नेमकं कारण काय?

LPG Gas Cylinder : गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता अर्धा गॅस मिळणार, नेमकं कारण काय?

LPG Gas Cylinder : घरगुती LPG गॅस सिलेंडर वापराबाबत सरकारने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 14.2 किलो वजनाचा मिळणारा सिलेंडर आता 8 ते 10 किलो गॅसनेच भरून दिला जाणार आहे. मात्र, सिलेंडरचा आकार तोच राहणार असून फक्त गॅसचे प्रमाण कमी केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या उपलब्ध असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर कमी वजनात भरण्याचे निर्देश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत. ग्राहकांकडूनही वापरलेल्या गॅसनुसारच पैसे आकारले जाणार आहेत.

या बदलामुळे घरगुती सिलेंडर पूर्वीपेक्षा कमी दिवस पुरणार असल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. तसेच कमी वजनाच्या सिलेंडरची किंमत किती असेल, याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, मध्यपूर्वेतील इराण-इस्त्रायल संघर्ष चिघळल्यामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गॅस फील्ड आणि तेल साठ्यांवर हल्ले झाल्याने पुढील काही महिन्यांत टंचाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी हे पाऊल उचलले आहे.

यापूर्वी गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले होते. तसेच व्यावसायिक वापराच्या गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाला होता. आता मात्र सरकारने व्यावसायिक LPG पुरवठ्यात वाढ करून हॉटेल आणि अन्न व्यवसायांना काहीसा दिलासा दिला आहे.

एकूणच, या निर्णयामुळे सामान्य नागरिकांवर थेट परिणाम होणार असून पुढील काही महिन्यांत परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!