Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara sp suspend : विधानपरिषदेत महायुतीत जोरदार खडाजंगी; नीलम गोऱ्हे यांचा मोठा निर्णय, IPS अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

Satara sp suspend : विधानपरिषदेत महायुतीत जोरदार खडाजंगी; नीलम गोऱ्हे यांचा मोठा निर्णय, IPS अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

Satara sp suspend : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळाचे पडसाद थेट विधानपरिषदेत उमटले. या मुद्द्यावरून महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंत्री शंभुराज देसाई यांनी साताऱ्यातील घटनेवरून पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

देसाई यांनी पोलीस अधीक्षकांनी निष्पक्षतेने काम न करता “घरगड्यासारखे” वागल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.

या निर्णयामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. साताऱ्यातील घटनेचा तपास आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आता अधिक लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!