Today मंगळवार, 4th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Petrol Diesel Price: राज्यातील वाहनधारकांना दिलासा! जागतिक युद्धजन्य परिस्थितीनंतरही महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: राज्यातील वाहनधारकांना दिलासा! जागतिक युद्धजन्य परिस्थितीनंतरही महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: जागतिक स्तरावरील राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या छायेमुळे आज, २३ मार्च रोजी भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेषतः मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून, काही राज्यांमध्ये इंधनाचे दर कडाडले आहेत, तर काही ठिकाणी सर्वसामान्यांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेने इराणला दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर जागतिक तेल व्यापारात मोठी खळबळ उडाली असून, ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ११२.१७ डॉलरवर पोहोचला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस ७२.४८ डॉलरवर असणारे कच्चे तेल अवघ्या काही आठवड्यांत १०० डॉलरच्या पार गेल्याने जागतिक अर्थव्यवस्था हादरली आहे. या ऐतिहासिक दरवाढीचा बोजा आता ग्राहकांच्या खिशावर पडू लागला आहे.

महाराष्ट्रात किमतीत किंचित घट, तर इतर राज्यांत महागाई
राज्यानुसार इंधनाच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. याउलट, महाराष्ट्र आणि गुजरातच्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दरात ७ पैसे आणि डिझेलमध्ये ९ पैशांची घट नोंदवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर १०५.४३ रुपये आणि डिझेलचा दर ९१.९४ रुपये इतका आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही इंधनाचे दर काही अंशी कमी झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!