Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Iran-US War: अमेरिका-इराण युद्ध टळलं? ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय; इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित

Iran-US War: अमेरिका-इराण युद्ध टळलं? ट्रम्प यांचा ऐतिहासिक निर्णय; इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी स्थगित

Iran-US War: गेल्या 24 दिवसांपासून मध्य-पूर्वेमध्ये सुरू असलेल्या भीषण संघर्षाला अखेर तात्पुरता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील सर्व लष्करी हल्ले पुढील 5 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चा होणार असून, भविष्यातील दिशा या वाटाघाटींवरून ठरवली जाणार आहे.

‘ट्रुथ सोशल’वरून ट्रम्प यांची मोठी घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘Truth Social’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. “मला जाहीर करताना आनंद होत आहे की, गेल्या 2 दिवसांत अमेरिका आणि इराणमध्ये अत्यंत विधायक चर्चा झाली आहे. शत्रुत्व संपवून सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सकारात्मक संकेतांमुळेच मी युद्ध विभागाला (Department of War) इराणची वीज केंद्रे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले 5 दिवसांसाठी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत,” असे ट्रम्प यांनी नमूद केले.

ऊर्जा संकट आणि जागतिक दबाव
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचे लष्करी तळ आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. या 24 दिवसांच्या युद्धामुळे जगभरात तेल आणि वायूच्या किमती गगनाला भिडल्या असून, तीव्र ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. याच जागतिक दबावामुळे अमेरिकेने चर्चेचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जात आहे.

पुढील आठवडा महत्त्वाचा
ट्रम्प यांच्या मते, इराणसोबतच्या या वाटाघाटी पुढील संपूर्ण आठवडाभर सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, ही लष्करी स्थगिती केवळ पुढील 5 दिवसांसाठीच आहे. जर या बैठकांमध्ये अपेक्षित यश मिळाले, तरच ही स्थगिती पुढे वाढवली जाईल. अन्यथा, पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

इस्रायलची भूमिका काय?
अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरू असली, तरी या संघर्षातील तिसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या इस्रायलची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. २८ फेब्रुवारीच्या घटनेनंतर इराणने इस्रायलवरही मोठे हल्ले केले होते. आता ट्रम्प यांच्या या निर्णयाला इस्रायलकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!