Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एलपीजी बुकिंग संदर्भात मोठी अपडेट! शहरी आणि ग्रामीण भागात कधी करता येणार सिलेंडर बुक? सरकारने दिली स्पष्ट माहिती

एलपीजी बुकिंग संदर्भात मोठी अपडेट! शहरी आणि ग्रामीण भागात कधी करता येणार सिलेंडर बुक? सरकारने दिली स्पष्ट माहिती

LPG Cylinders Booking Rules: एलपीजी बुकिंगविषयी अनके वृत्त समोर येत आहे. त्यात सरकारने गॅस बुकिंग नियमात मोठा बदल केल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांकडे दोन सिलेंडर म्हणजे डबल बॉटल कनेक्शन आहे, त्यांना नवीन गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस लागतील असा दावा करण्यात आला होता. पूर्वी हा कालावधी 25 दिवसांचा होता. हा नियम शहरी-ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी लागू असेल असे सांगण्यात येत होते. पण आता सरकारने या वृत्तांचे खंडन केले आहे. शहरी भागांसाठी 25 दिवस तर ग्रामीण क्षेत्रासाठी 45 दिवस याप्रमाणे गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम जैसे थे असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

अनेक बातम्या आणि सोशल मीडियातील दाव्यानुसार एलपीजी कनेक्शनवर सरकारने मोठा फैसला केला आहे. ज्या ग्राहकांकडे दोन सिलेंडर आहे. आता त्यांना नवीन सिलेंडर बुक करण्यासाठी 35 दिवस वाट पाहावी लागेल असे सांगण्यात येत होते. म्हणजे एक सिलेंडर वापराल आणि एक स्टँडबाय म्हणून घरात असेल. पण पुढील बुकिंग 35 दिवसानंतर होईल. पूर्वी हा कालावधी 25 दिवसांचा होता. आता सरकारने हा कालावधी वाढवल्याचे वृत्त समोर आले. पण आता सरकारने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. सरकारने या वृत्ताचे खंडण केले आहे. एलपीजी बुकिंगमध्ये सध्या आता कोणताही बदल नाही.

वृत्तातील दाव्यानुसार, पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत ग्राहकांना आता 45 दिवसानंतर नवीन सिलेंडर बुक करण्याची परवानगी दिली. तर ज्या लोकांकडे सिंगल बॉटल कनेक्शन आहे, त्यांना 25 दिवसानंतर सिलेंडर मिळत राहिल. या सर्व दाव्यांवर सरकारने स्पष्ट केले आहे की, असा कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे याविषयीचे सर्व वृत्त खोटी असल्याचे समोर येत आहे. सरकारने ही सर्व वृत्त फेटाळून लावली आहे.

हेही वाचा- Dombivli: इराणमधील युद्धाचा डोंबिवलीत ‘धूर’; पार्किंगमध्ये चुली पेटल्या, शेफ तोडतायत लाकडं

एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलवर सरकारची भूमिका

सरकार एलपीजी पुरवठा आणि पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याविषयी सरकारने मोठे वक्तव्य जाहीर केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याविषयी वक्तव्य दिले आहेत. त्यानुसार, देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी पुरवठा सुरू आहे. पॅनिक होण्याची काहीएक गरज नाही. सरकारने साठेबाजांविरोधात आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पाऊल टाकले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!