Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. फेब्रुवारी २०२६ चा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारने हालचाली तीव्र केल्या असून, निधी वितरणाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

२७७ कोटींचा निधी मंजूर; हप्ता कधी येणार?
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच भगिनींच्या बँक खात्यात वळता करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने २७७ कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीचा हप्ता २३ फेब्रुवारीला मिळाला होता, त्यामुळे आता फेब्रुवारीचा प्रलंबित हप्ता येत्या काही दिवसांतच जमा होण्याची दाट शक्यता आहे.

३१ मार्चची डेडलाईन विसरू नका
योजनेचा लाभ सातत्याने मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक महिलांनी प्रक्रियेदरम्यान चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे हप्ते तांत्रिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने ही चूक सुधारण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत वेळ दिली आहे. आता हातात केवळ ६ दिवस उरले आहेत. जर या मुदतीत ई-केवायसी दुरुस्ती केली नाही, तर तुमचा पुढचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो.

लाभार्थींच्या संख्येत घट?
ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे लाभार्थी महिलांच्या एकूण संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे आणि ज्या पात्र आहेत, त्यांनी तातडीने आपल्या मोबाईल किंवा नजीकच्या संगणक केंद्रावरून आपली माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!