पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 47 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 47 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०७ आणि ०९ एप्रिल २०२६.
– मुलाखतीचा पत्ता : डीन कार्यालय, सेंट्रल रोड, एमआयडीसी, एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००९३.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


