मुंबई : अभिनय क्षेत्रात आल्यावर अनेकांना आपली इमेज मजबूत बनवायची असते. त्यानुसार, ते मेहनतही करतात. त्यात काहींना अगदी कमी वयात चांगले यश मिळते. काही अभिनेत्रींनी तरुण वयातच यश मिळवताना दिसत आहेत. आरामाचे जीवन या मेहनतीतून त्या जगत आहेत. त्यांनी प्रसिद्धी, संपत्ती आणि ओळख मिळवली.
अशनूर कौर या टीव्ही अभिनेत्रीने वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले. तिचे आलिशान घर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पडदे अलेक्साला जोडलेले आहेत आणि म्युझिक स्पीकर भिंतीवर लावलेले आहेत. अशनूरने तिच्या आई-वडिलांसाठी आणखी एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. तसेच ‘ये है मोहब्बतें’ मधील रुहानिका धवन हे टीव्ही जगतातील एक मोठे नाव आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तिने मुंबईत तिच्या स्वप्नातील घर खरेदी केले.
‘झांसी की रानी’ आणि ‘इंटरनेट वाला लव्ह’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेली अनुष्का सेन एक तरुण स्टार मानली जाते. ती कोरियामध्येही प्रसिद्ध आहे. वयाच्या २१ व्या वर्षी अनुष्काने कोट्यवधी रुपयांचे घर खरेदी करून आपल्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला.
जन्नत झुबेर रहमानीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ती एका आलिशान घराची मालकीण झाली. ती इन्स्टाग्रामवर नियमितपणे तिच्या स्वप्नातील घराची झलक शेअर करत असते. अभिनयाव्यतिरिक्त, जन्नत अबायाचा व्यवसायही चालवते.


