Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat : भोंदू खरातची पुण्यात ‘माया’; मुलीच्या नावावर 1.20 कोटींचा फ्लॅट, धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat : भोंदू खरातची पुण्यात ‘माया’; मुलीच्या नावावर 1.20 कोटींचा फ्लॅट, धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक आर्थिक माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात त्याच्या मुलीच्या नावावर आलिशान फ्लॅट असल्याचे उघड झाले आहे. ‘24 रत्नम’ या उच्चभ्रू सोसायटीत सातव्या मजल्यावर असलेला सुमारे 1055 चौरस फूटाचा 3 बीएचके फ्लॅट 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या फ्लॅटसाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सेल डीडमध्ये चेकद्वारे व्यवहाराचा कोणताही उल्लेख नसल्याने संपूर्ण व्यवहार कॅशमध्ये झाल्याची चर्चा आहे. राज्यभरातील लोकांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशांतून अशोक खरातने विविध शहरांमध्ये मालमत्ता उभी केल्याचा आरोपही समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात काल रात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. एसआयटी पथक घरावर पोहोचण्याआधीच खरातची पत्नी फरार झाली, तर मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात पत्नीचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासात सहकार्य न केल्याने त्याची मुलासमोर चौकशी करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. एसआयटीकडून अधिक माहिती मिळवून फरार आरोपींचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.

या प्रकरणात लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर आरोपांची चौकशी सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!