Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या रणनीतीकाराला दाखवला बाहेरचा रस्ता; सुनेत्रा पवारांच्या निर्णयाने खळबळ

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या रणनीतीकाराला दाखवला बाहेरचा रस्ता; सुनेत्रा पवारांच्या निर्णयाने खळबळ

Sunetra Pawar : मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठा राजकीय निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाचे रणनीतीकार नरेश अरोरा यांचे कंत्राट अखेर रद्द करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.

देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा उपस्थित होते. ‘डिझाईन बॉक्स’ या कंपनीला पुन्हा काम देण्याच्या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार वाद झाला. पक्षातील अनेक नेत्यांनी अरोरा यांना पुढे संधी देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली.

अजित पवार यांच्या निधनानंतर अरोरा यांनी पक्षातील आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याची नाराजी अनेक नेत्यांमध्ये होती. त्यामुळेच त्यांच्या विरोधात मतैक्य तयार झाले आणि अखेरीस त्यांचे कंत्राट संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वीही सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या कोअर कमिटी बैठकीत अरोरा यांच्या सूचनांवरून वाद निर्माण झाला होता. त्या वेळीही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि अरोरांना बैठकीतून बाहेर जावे लागले होते.

नरेश अरोरा यांची ‘डिझाईन बॉक्स’ कंपनी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसाठी रणनीती आखत होती. प्रचार नियोजन आणि प्रतिमा उभारणीमध्ये या कंपनीची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, पक्षांतर्गत वाढलेल्या मतभेदांमुळे अखेर अरोरा यांचा प्रवास थांबला आहे.

या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!