Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Lava ने लाँच केला Lava Bold N2 Pro फोन; 50MP कॅमेरासह 5000mAh ची बॅटरीही मिळणार

Lava ने लाँच केला Lava Bold N2 Pro फोन; 50MP कॅमेरासह 5000mAh ची बॅटरीही मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने Lava Bold N2 Pro हा फोन लाँच केला आहे. कंपनीने हा फोन ७९९९ रुपयांमध्ये आणला आहे. या किंमत श्रेणीमध्ये फोनला वेगळे बनवण्यासाठी, कंपनीने १२०Hz डिस्प्ले, ५०MP कॅमेरा आणि १२८GB स्टोरेज यांसारख्या फीचर्सचा समावेश केला आहे.

Lava Bold N2 Pro या फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.७५-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. यामुळे स्क्रोलिंग आणि दैनंदिन वापर खूपच सुरळीत होतो. या किंमत श्रेणीमध्ये साधारणपणे ९०Hz डिस्प्ले उपलब्ध असतात, त्यामुळे १२०Hz हे एक महत्त्वपूर्ण अपग्रेड मानले जाते. हा फोन Unisoc T7250 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड असणार आहे. जो सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि कॉलिंग यांसारख्या मूलभूत वापरासाठी चांगली कार्यक्षमता देतो. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जे या किंमतीत एक मोठी जमेची बाजू आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर चालतो आणि एक क्लिन, जवळपास ब्लोटवेअर-मुक्त अनुभव देतो. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडिओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी पूर्ण दिवस बॅटरी लाईफ देण्याचा दावा करते. यात 18W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!