Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर बसस्थानकाची ‘स्वच्छ, सुंदर’ अभियानांतर्गत तपासणी; प्रवाशांसाठी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना

इंदापूर बसस्थानकाची ‘स्वच्छ, सुंदर’ अभियानांतर्गत तपासणी; प्रवाशांसाठी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना

इंदापूर : प्रतिनिधी

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 2026” अंतर्गत इंदापूर बसस्थानकाची सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बसस्थानकातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

या वेळी विभागीय कर्मचारी अधिकारी राजेश्वर जाधव यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरातील स्वच्छता, प्रतीक्षालयांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची स्वच्छता तसेच बससेवेची वेळापत्रक व्यवस्था याबाबत सखोल निरीक्षण करण्यात आले. काही ठिकाणी स्वच्छतेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या उपक्रमात पत्रकार व प्रवासी मित्रांनीही सक्रिय सहभाग घेतला. पत्रकार सुधाकर बोराटे (दैनिक भास्कर), पत्रकार दिपक खिलारे (महाराष्ट्र जागरण), संदीपान कडवळे, अमोल मिसाळ, प्रताप मिसाळ, सोमनाथ शिंदे व सुनिल कोरटकर यांनी बसस्थानकातील समस्या व प्रवाशांच्या अडचणींबाबत सूचना मांडल्या.

अधिकाऱ्यांनी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा निर्धार व्यक्त करत बसस्थानक स्वच्छ, सुरक्षित आणि सुबक ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे सांगितले. या अभियानामुळे इंदापूर बसस्थानकाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी आगार प्रमुख हनुमंत गोसावी, वाहतुक अधिक्षक संजय वायदंडे, वाहतूक नियंत्रक विक्रमसिंह चंदनशिवे आदी उपस्थित होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!