Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Unseasonal Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pune Unseasonal Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pune Unseasonal Rain: पुणे शहरात गुरुवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने एका महिलेचा बळी घेतला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील नवश्या मारुती मंदिराजवळ अंगावर झाड कोसळल्याने रंजना नवनाथ गिरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?
दुपारच्या सुमारास पुण्याच्या विविध भागांत पावसाने अचानक रौद्र रूप धारण केले. सिंहगड रोड परिसरात पाऊस आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. यावेळी तिथे उपस्थित असलेले तीन जण झाडाखाली गाडले गेले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून झाडाखाली अडकलेल्यांना बाहेर काढले; मात्र रंजना गिरी यांना वाचवण्यात अपयश आले.

पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत
तासभर झालेल्या या पावसाने केवळ सिंहगड रस्ताच नव्हे, तर कोथरूड, कोंढवा, दापोडी, उत्तमनगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरालाही झोडपून काढले. या पावसामुळे शहरात खालीलप्रमाणे परिणाम दिसून आले. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अचानक आलेल्या पुरासारख्या परिस्थितीमुळे अनेक वाहने पाण्यात अडकली, तर काहींची इंजिने बंद पडल्याने चालकांचे प्रचंड हाल झाले.

हवामान खात्याने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहील आणि पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे पुण्यात पहिली जीवितहानी झाली असून, प्रशासनाने नागरिकांना झाडांखाली किंवा जुन्या इमारतींजवळ आश्रय न घेण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!