Today बुधवार, 19th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nagpur Crime: डोक्यावर वार, विवस्त्र अवस्था… नागपुरातील ‘त्या’ बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह सापडला

Nagpur Crime: डोक्यावर वार, विवस्त्र अवस्था… नागपुरातील ‘त्या’ बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह सापडला

Nagpur Crime: नागपुरातील वाडी परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत झुडपात फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुचित भोजापुरे (४४) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रात्रीपासून बेपत्ता, सकाळी आढळला मृतदेह
मशिनरी स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय करणारे सुचित भोजापुरे हे गुरुवारी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी खडगाव मार्गावरील एका निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह नागरिकांना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत तपास सुरू केला.

हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?
घटनास्थळी सुचित यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. त्यांच्या डोक्यावर जड शस्त्राने किंवा वस्तूने वार करण्यात आले आहेत. मृतदेहाजवळ त्यांचे वाहन, मोबाईल किंवा कोणतेही ओळखपत्र सापडले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांची हत्या अन्य कोठेतरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह या निर्जन ठिकाणी फेकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशेष पथकामार्फत तपास सुरू
सुचित यांच्या वडिलांनी ही नियोजित हत्या असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेचा छडा लावण्यासाठी वाडी पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. या थरारक हत्याकांडामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!