Today गुरूवार, 2nd जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात खाकी वर्दीही संशयाच्या भोवऱ्यात; दोन बड्या महिला पोलीस अधिकारी भोंदूबाबाच्या संपर्कात?

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात खाकी वर्दीही संशयाच्या भोवऱ्यात; दोन बड्या महिला पोलीस अधिकारी भोंदूबाबाच्या संपर्कात?

Ashok Kharat Case: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे आता प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत. एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याचे नाव चर्चेत आल्यानंतर, आता राज्य पोलीस दलातील दोन वरिष्ठ महिला अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आवडत्या पोस्टिंगसाठी ‘बाबा’चा सहारा?
मिळालेल्या माहितीनुसार, खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी (DCP) तर दुसरी एसीपी (ACP) दर्जाची अधिकारी आहे. आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली किंवा पोस्टिंग मिळावी यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी खरातची मदत घेतली होती का, असा संशय व्यक्त केला जात आहे. या बदल्यांच्या बदल्यात खरातसोबत काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का? यादृष्टीने आता तपास यंत्रणांनी मोर्चा वळवला आहे.

विज्ञानाच्या नावाखाली लैंगिक शोषणाचं जाळं
एसआयटी (SIT) समोर झालेल्या चौकशीत खरातने धक्कादायक खुलासे केले आहेत. “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए,” अशी दर्पोक्ती करत त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे समजते. ज्याला लोक चमत्कार किंवा वशीकरण समजायचे, ती केवळ हातचलाखी असल्याचे त्याने मान्य केले. विज्ञानाचे नाव देऊन महिलांना जाळ्यात ओढणे आणि नंतर त्यांना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली खरातने दिली आहे.

कुटुंबीयांचीही होणार कसून चौकशी
अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस असून, तपासाची व्याप्ती आता त्याच्या कुटुंबापर्यंत वाढली आहे. त्याचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलीची आज एसआयटीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, खरातची पत्नी कल्पना अजूनही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील तपासाचा प्रगती अहवाल आणि आतापर्यंत हाती लागलेले पुरावे यावर भाष्य करण्यासाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत खरातचे आर्थिक व्यवहार आणि लैंगिक शोषणाबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, खरातला मदत करणाऱ्यांचे चेहरे लवकरच समोर येण्याची चिन्हे आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!