Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: क्रूरतेचा कळस! पुस्तकांच्या वयात हाती पाळणा; अल्पवयीन लेकीचा बळजबरीने करायला लावलं ‘हे’ काम

Pune Crime: क्रूरतेचा कळस! पुस्तकांच्या वयात हाती पाळणा; अल्पवयीन लेकीचा बळजबरीने करायला लावलं ‘हे’ काम

Pune Crime: रक्षणकर्तेच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा समाजाची नैतिकता किती खालावली आहे याचे विदारक दर्शन घडते. शिक्षणाच्या वयात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला संसाराच्या जोखडात ओढून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार चहोली खुर्द परिसरात उघडकीस आला आहे. स्वतःच्या पोटच्या मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी आई-वडिलांसह एकूण सात जणांविरुद्ध आळंदी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा अघोरी प्रकार घडला. पीडित मुलगी अवघ्या १७ वर्षे २ महिन्यांची असताना, तिच्या भविष्याचा विचार न करता आई-वडील, मामा आणि सासरच्या मंडळींनी मिळून तिचा विवाह लावून दिला. कायद्याने लग्नाचे वय नसतानाही तिला बळजबरीने या नात्यात ढकलण्यात आले.

अत्याचार आणि अल्पवयात मातृत्व
लग्नानंतर पीडितेचा छळ थांबला नाही. सासरी पतीकडून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी अल्पवयातच गरोदर राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. खेळण्या-बागडण्याच्या वयात या मुलीवर मातृत्व लादले गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आळंदी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली आहेत. पीडितेचा पती, सासू-सासरे, आई-वडील आणि मामा यांच्यासह सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजात संतापाची लाट
स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनीच एका मुलीचे आयुष्य अंधकारात लोटल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!