नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 6 भारतात लाँच केला आहे. कंपनी याला मिड-रेंज सेगमेंटमधील एक मोठा गेम-चेंजर म्हटले आहे. या फोनमध्ये कंपनीने गेमिंग, बॅटरी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर लक्ष केंद्रित केले आहे.
OnePlus Nord 6 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ४ प्रोसेसर आहे, ज्यामुळे तो या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली फोनपैकी एक बनतो. हा फोन १६५fps पर्यंत गेमिंगला सपोर्ट करतो, जे या किंमत श्रेणीमध्ये प्रथमच घडत आहे. यामध्ये ३२००Hz टच सॅम्पलिंग रेट आणि हाय-प्रिसिजन गायरोस्कोप आहे, ज्यामुळे बीजीएमआय, सीओडी मोबाईल आणि फ्री फायर मॅक्स सारख्या गेम्समध्ये स्मूथ अनुभव मिळतो. यामध्ये ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा फोन ४के ६०एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो आणि फोटो व व्हिडिओ अधिक चांगले करण्यासाठी एआय (AI) फीचर्सचा वापर करतो.
कंपनीच्या मते, या फोनचा AnTuTu स्कोअर २५ लाखांपेक्षा जास्त आहे. या सेगमेंटमधील फोनला साधारणपणे इतका जास्त स्कोअर मिळतो. वनप्लस नॉर्ड ६ मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ५० मेगापिक्सेलचा सोनीचा मुख्य सेन्सर आहे. या फोनमध्ये जी२ वाय-फाय चिप (G2 Wi-Fi chip) आहे, जी गर्दीच्या नेटवर्कवरही उत्तम सिग्नल परफॉर्मन्स देण्याचे वचन देते. यात 5G ॲडव्हान्स्ड (5G Advanced) सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे डेटा स्पीड आणि कनेक्टिव्हिटी सुधारते. या फोनमध्ये फ्लॅगशिपसारखा डिस्प्ले देखील आहे.


