Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Karuna Sharma: ‘पार्थ पवारांचा मान राखणार होते, पण धनंजय मुंडेंनी…’; करुणा शर्मा बारामतीतून लढण्यावर ठाम

Karuna Sharma: ‘पार्थ पवारांचा मान राखणार होते, पण धनंजय मुंडेंनी…’; करुणा शर्मा बारामतीतून लढण्यावर ठाम

Karuna Sharma: राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात असताना, करुणा शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. खासदार पार्थ पवार यांनी फोन करून माघार घेण्याची भावनिक विनंती केली होती, मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत करुणा शर्मा यांनी लढण्याची घोषणा केली.

नेमका वाद काय?
करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयामागची ‘इनसाईड स्टोरी’ उघड केली. “पार्थ पवार यांनी ही निवडणूक आमच्यासाठी दुःखाची असल्याचे सांगत अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांचा मान राखून मी माघार घेणार होते, पण धनंजय मुंडे यांच्या सोशल मीडिया पोस्टने सर्व बिघडवले,” असे शर्मा म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी स्वतः विनंती करण्याऐवजी इतरांच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, मुंडेंनी उचकवल्यामुळेच आता मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

अजितदादांचा अपघात आणि बारामतीचे स्थानिक प्रश्न
केवळ राजकीय संघर्षासाठीच नाही, तर काही गंभीर मुद्द्यांवरून आपण निवडणूक लढवत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. “अजितदादांच्या अपघातानंतर एफआयआर (FIR) दाखल व्हायला हवा होता, तो का झाला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय बारामतीमधील रस्ते, शाळा आणि स्थानिक समस्यांचा मुद्दा घेऊन आपण मतदारांसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

23 उमेदवार रिंगणात
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्यासह एकूण 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. एकूण 53 अर्जांपैकी आता 23 उमेदवार रिंगणात उरले आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आता करुणा मुंडे-शर्मा आणि ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले हे दोन चर्चेतील चेहरे उभे ठाकल्याने बारामतीची पोटनिवडणूक आता अधिक रंगतदार होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!