Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापुरात कडक आदेश! विनापरवाना पुतळा बसवला तर FIR; ४ तासांत हटवणार प्रशासन

सोलापुरात कडक आदेश! विनापरवाना पुतळा बसवला तर FIR; ४ तासांत हटवणार प्रशासन

Solapur Statue Issue : सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळ्यांच्या वाढत्या प्रकरणांवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता विनापरवाना पुतळा उभारल्यास संबंधितांवर थेट FIR दाखल करण्यात येणार असून, असा पुतळा ४ तासांच्या आत हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त परिपत्रकाद्वारे हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. यासोबतच, अशा पुतळ्यांची माहिती लपवणाऱ्या पोलीस पाटलांवर सात दिवसांत निलंबनाची कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तसेच, कोणत्याही घटनेची पूर्वकल्पना न दिल्यास ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात घडलेल्या अनधिकृत पुतळा प्रकरणांनंतर प्रशासनाने ही कडक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, पुतळा उभारण्यासाठी ९ अटी आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जागेची मालकी, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीचा ठराव, पोलिसांचा अहवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांसारख्या आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, परवानगीशिवाय पुतळा देणाऱ्या कारखानदारांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित कारखाना सील करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

अनधिकृत पुतळ्याची माहिती मिळताच एका तासात उपविभागीय अधिकारी, पोलीस आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, माढा तालुक्यातील अंजनगाव येथे झालेल्या वादानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ‘भोसे पॅटर्न’ लागू करत गावकऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अनधिकृत पुतळा हटवून कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केल्याने या उपक्रमाला पहिले यश मिळाले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!