Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pashan Lake: पाषाण तलावातील माशांचा मृत्यू महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगलट; 4 जण निलंबित, मुख्य अभियंत्याला नोटीस

Pashan Lake: पाषाण तलावातील माशांचा मृत्यू महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगलट; 4 जण निलंबित, मुख्य अभियंत्याला नोटीस

Pashan Lake: पुण्यातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पुणे महानगरपालिका (PMC) प्रशासनाने मोठी कारवाई केली असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चार अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात प्रशासनाचा धाक निर्माण झाला आहे.

कोणावर झाली निलंबनाची कारवाई?
तलावातील प्रदूषण रोखण्यात आणि सांडपाणी प्रकल्पावर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल आयुक्तांनी खालील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे:
१. अजयकुमार वायसे (कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण विभाग)
२. अतुलकुमार कट्स (कनिष्ठ अभियंता)
३. विजय भोईर (आरोग्य निरीक्षक, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय)
४. विनायक चोपडे (आरोग्य निरीक्षक, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय)

याशिवाय, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांनाही या निष्काळजीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मृत्यूचे नेमके कारण काय?
तपासाअंती या घटनेमागील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाषाण तलावाजवळ १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने प्रक्रिया न केलेले विषारी सांडपाणी थेट तलावाच्या पाण्यात मिसळत होते. यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आणि परिणामी हजारो निष्पाप जलचरांचा जीव गेला.

जनक्षोभ आणि प्रशासकीय पाऊल
तलावातील दूषित पाण्यामुळे केवळ जलचरांचाच बळी गेला नाही, तर परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. या वाढत्या दबावानंतर पालिकेने केवळ कागदी घोडे न नाचवता थेट निलंबनाची कठोर कारवाई करत जबाबदारी निश्चित केली आहे. पाषाण तलावाचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तलावाची स्थिती बिघडल्याने आता पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!